जग कसं अजब आहे!
देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
…पण ’त्याच्या घरी’ जायची
घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
…पण त्याच्या घरी आपण जायच्या
विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला म्हणजे,
’सण, उत्सव आणि आनंद.’
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
’दुःख, शोक.’
देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये
म्हणूनही आटापिटा.
देवाघरून येणं म्हणजे ’जन्म’.
देवाघरी जाणं म्हणजे ’मृत्यु’.
दोन्हीही अटळ आहेत.
पण ह्या दोघांमधली जी ’गंमत’ आहे,
त्यालाच तर ’आयुष्य’ असे नाव आहे.

  • व. पु. काळे

आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही… परंतु पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात…


टक्के कमी पडले म्हणुन नाराज होऊ नका कारण 44, 54 व 56 वाल्यांनी 105 वाल्यांना घरी बसवले.


अकबर बादशहा… अरे बिरबल मला सांग आपल्या राज्यातील सर्वात जास्त काम करणारी गृहिणी कशी ओळखायची?
बिरबल… महाराज मी सर्वाना बोलावून घेतो व मग ठरवू.
बिरबल सर्वाना बोलावतो व एकीचा हात पकडून म्हणतो महाराज हीच ती…
महाराज … कशावरून?
बिरबल … महाराज मी हिचा मोबाईल चेक केला. हिच्या मोबाईलची बॅटरी 98 टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा