उच्च न्यायालयात धाव

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसांचा जामीन मागितला होता. विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. यानंतर देशमुख आणि मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर, न्यायमूर्ती पी.डी. नाईक आज (शुक्रवारी) सुनावणी घेणार आहेत. मतदानासाठी एक दिवसांचा जामीन मंजूर करण्यात यावा, अन्यथा पोलिस बंदोबस्तात त्यांना मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचा अर्ज करण्यात आला आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आज सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत मतदान पार पडणार आहे.

विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी जामीन नाकारल्यानंतर देशमुख आणि मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्थिक अफरातफर प्रकरणात त्यांना अटक झाली असून, ते सध्या तुरुंगात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा