पुणे ः पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश बागवे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणूक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
काँग्रेसने पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या पदाधिकार्‍यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मागील सहा वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर कार्यरत असलेले रमेश बागवे यांनी नुकताच प्रदेश काँग्रेसकडे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पाठविला होता. त्यानंतर मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अरविंद शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिंदे यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस गटनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. शिंदे यांच्या निवडीने सुमारे 30 वर्षांनंतर मराठा समाजाला शहराध्यक्ष पदावर संधी मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा