निष्कर्ष

दारू मुक्ती केंद्राचा वर्ग सुरू असतो. प्राध्यापक सरांच्या टेबलावर एक व्हिस्कीचा, एक व्होडकाचा, एक रमचा, एक गावठीचा, एक टकिलाचा आणि एक वाईनचा ग्लास ठेवलेला होता. वर्गाचं लक्ष त्या ग्लासकडे लागलंय हे पाहून सरांनी सहा किडे आणले आणि एक एक करून त्या ग्लासात सोडले. सोडताच क्षणी अर्ध्या अर्ध्या मिनिटांच्या फरकाने ते किडे बिचारे तडफडून मरूनच गेले. अचंबित झालेल्या चेहर्‍यांकडे विजयी नजरेने सरांनी तिरपा कटाक्ष टाकला.
सर : तर.. काय कळलं तुम्हाला यातून?
गंपू : काय तर काय. सोपं आहे. सर, याचा अर्थ की कोणती पण दारू प्या. पोटातले किडे-जंत मरणार म्हणजे मरणार.


एक भिकारी काकांना : मालक एक रुपया द्या… तीन दिवसापासून काही खाल्ले नाही….
काका (खोचकपणे) : अरे 3 दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय 3 दिवसात..


मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.
एक्स्चेज ऑफर.
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकू ओरडल्या
चला…. ऑफर फक्त मिक्सरची आहे ..


मुलीकडचे : आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खात – पीत नसावा, अन् काही चुकीचे काम करत नसावा.
पंडित : असा मुलगा तर तुम्हाला हॉस्पिटलच्या
आय.सी.यू वॉर्डातच मिळेल…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा