सांगली : दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तीन मित्र ठार तर एक जखमी झाला आहे. जत तालुक्यातील कोसारी येथे ही घटन घडली. चौघे मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे जात असताना हा अपघात झाला.
अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे आणि राजेंद्र भाले अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत. तर संग्राम विक्रम तोरवे हा जखमी आहे. कोसारी येथील अजित भोसले व त्याचे तीन मित्र एकाच मोटरसायकलवर शनिवारी जतला गेले होते. हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ नजीक असणार्‍या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि ती घसरून हा अपघात झाला. अजित भोसले हा जागीच ठार तर मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे हे जखमी झाले. त्यांना बिरनाळ येथील ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील गंभीर जखम झालेले मोहित शिवाजी तोरवे (वय 21), राजेंद्र भाले (वय 22) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संग्राम विक्रम तोरवे (वय 16) याच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच वेळी तिघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा