पिंपरी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. किवळे- देहूरोड परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.

या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत एकाच वेळी मायलेकीने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा