परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात, बाकी गैरसमज आहे
जेवताना शेतकर्‍याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये
कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरू नका परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो
सॉरी माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
नातं हृदयातून असावं. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात
लाकडाच्या ओडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते- झाडे लावा झाडे जगवा
नाती जिवंतपणीच सांभाळा, ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही!
नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध रहा
उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा
भावना ही जगातील सर्वात धोकादायकनदी आहे ह्यात सगळे वाहून जातात
मूर्खाशी कधीच वाद घालू नये. त्याची संख्या 1 ने वाढते


सगळेच विषय सांभाळणारी वही ‘रफ’ म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइडिंग असते, ना सुंदर कव्हर…
कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते.


वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ
आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा