पुणे : शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घेतला असून पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागा मार्फत कळविण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागा मार्फत २३ मे रोजी शहरातील विविध पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी २६ मे रोजी शहराचा दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला.

दुसर्‍या दिवशी म्हणजे २७ मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे एका कार्यक्रमाकरिता येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सर्व ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची नोंद शहरातील नागरिकांनी घ्यावी,असे आवाहन महापालिका प्रशासना मार्फत करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा