नाशिक : कॅप्टन अभिलाषा बराक या कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून लष्करात सहभागी झाल्या आहेत. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान बराक यांनी मिळवला. लष्कराने बुधवारी त्यांचा सन्मान केला. प्रशिक्षणानंतर त्या लष्करात रुजू झाल्या आहेत.

अभिलाषा बराक डायरेक्टर जनरल आणि कर्नल कमांडंटंट एव्हिएशनकडून प्रतिष्ठीत विंग्सने सन्मानित करण्यात आले. बराक यांचा फोटो लष्कराकडून ट्विट करण्यात आला आहे. युवा एव्हिएटर्स आता कॉम्बॅट एव्हिएशन स्क्वॉड्रनमध्ये पंख फैलावू उड्डाण करत आहे, असे लष्कराने ट्विटमध्ये म्हटले.

जून २०२१ मध्ये पहिल्यांदाच २ महिला अधिकाऱ्यांची निवड हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी झाली. त्या दोघींना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सहभागी होण्याची इच्छा १५ महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

सध्याच्या घडीला एव्हिएशन विभागात महिलांना ट्रॅफिक कंट्रोल आणि ग्राऊंड ड्युटी दिली जाते. मात्र आता त्यांना पायलट म्हणून जबाबदारी दिली जाईल. २०१८ मध्ये हवाई दलाच्या फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदींनी विमान घेऊ उड्डाण केले. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या.

१ नोव्हेंबर १९८६ मध्ये एक विभाग म्हणून आर्मी एव्हिएशन कोरची (एएसी) निर्मिती करण्यात आली. लष्करातील सर्वात प्रतिष्ठित विभाग अशी एएसीची ओळख आहे. एएसीच्या उमेदवारांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (सीएटीएस) प्रशिक्षण देण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा