नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणी वारणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार आहे. मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या अर्जावर ७ -११ सीपीसी अंतर्गत अर्जांवर न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायायाकडे प्रवर्ग

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायायाकडे प्रवर्ग करण्यात आली होती. न्यायमूर्तींनी अ‍ॅडव्होकेट कमिशनरच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पक्षांकडून आक्षेप मागवले आहेत. सर्वेक्षण अहवालावर आक्षेप मागवायचे की मशीद समितीच्या आदेश नियम ७-११ अर्जावर आधी सुनावणी घ्यायची याबाबत न्यायालय आज आदेश देणार होते. सुनावणी दरम्यान खटला प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत प्रतिबंधित असल्याचा युक्तिवाद मस्जिद समितीने केला आहे. तर हिंदू अर्ज कर्त्यांनी सर्वेक्षण अहवालाचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

या सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणी दरम्यान केवळ पक्षकार आणि वकिलांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येत होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा