चंडीगढ ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ’मन की बात’ नावाने फेसबुक लाईव्ह करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच, ‘गुडबाय आणि गुडलक काँग्रेस’ असे म्हणत पक्षाचा निरोप घेतला.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने नुकतेच जोरदार ताशेरे ओढले होते. तसेच, पक्षविरोधी कारवायांसाठी जाखड यांना सर्व पदांवरून काढून टाकले होते. त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे जाखड नाराज होते. जाखड तीन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले आहेत. पक्ष सोडत असताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चांगली व्यक्ती म्हणून प्रशंसा केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा