वॉशिंग्टन : चंद्रावरून आणलेल्या मातीत रोपटे उगविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशा प्रकारचा पहिला प्रयोग होता. विशेष म्हणजे तो यशस्वी देखील झाला आहे
अमेरिकेने चंद्रावर अनेकदा अपोलो मोहिमा राबविल्या होत्या. त्यांपैकी एका मोहिमेत चंद्रावर वास्तव्य करण्यासाठी अन्‍न आणि प्राणवायूची गरज भागविण्याबाबत संशोधन करण्यात आले होते. अवकाशवीरांनी त्या वेळी चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली होती. त्याच मातीत त्यांनी धान्य पेरले. तेव्हा त्यातून रोपटे उगविले. या संदर्भातील संशोधन जर्नल कम्युनिकेशन बायालॉजी मध्ये प्रसिद्ध झाले आहे. चंद्रावरून आणलेल्या मातीत हे रोपटे कसे तग धरते, याचा अभ्यास सुरू आहे. चंद्रावरील आणि पृथ्वीवरील मातीत मोठा फरक आहे. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. चंद्रावर वास्तव्य करण्यासाठी हा प्रयोग मोलाचा ठरेल, असा विश्‍वास आहे. अवकाशात रोपटे कसे तग धरते, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे रॉब फर्ल यांनी स्पष्ट केले. मोठ्या अवकाश मोहिमा राबविताना चंद्र हा एक स्थानक स्वरूपात वापरण्याची योजना आहे. तेथून पुढील मोहिमा आखता येतील, अशी योजना आहे. त्यामुळे तेथील मातीचा वापर करून झाडे निर्माण करता येतील का, याचा विचार सुरू आहे. संशोधकांनी त्यासाठी 12 ग्रॅम चंंद्रावरील मातीचा वापर केला. त्यात पाणी, पोषक तत्त्वे आणि प्रकाशाची व्यवस्था केली. नासाने चंद्रावरील ही माती अपोलो 11, 12 आणि 17 मोहिमेवेळी आणली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा