पुणे : देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 48 तासारत मान्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात धडकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी व्यक्‍त केला. अंदमान आणि केरळमध्येही मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. सद्य:स्थितीत मान्सूनच्या वाटचालीत कोणताही अडथळा नसल्याने महाराष्ट्रातही यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा आहे.
मागील चार दिवसांपासून अंदमान समुद्रावर पावसाळी वातावरण आहे. अंदमान परिसरातही पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. यावेळी वेळेआधीच अंदामान मान्सूनने व्यापल्यास, तसेच पुढील वाटचालीस अडथळा निर्माण न झाल्यास मान्सून 27 मे रोजी देवभूमी केरळात दाखल होईल. केरळपासून पुढच्या प्रवासात अडथळा न आल्यास 1 जूनपर्यंत मान्सून कोकण किणारपट्टीला (महाराष्ट्रात) दाखल होईल. त्यानंतर पुढील चार दिवसांच्या कालावधीत मान्सूनचा पुणे, मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण झालेले असेल. मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्यास केरळपासून ते महाराष्ट्रपर्यंतचा मान्सूनचा प्रवास लांबू शकतो. 
सांख्यिकी मॉडेल आधारावर हवामान विभागाने मान्सून 27 मे ला केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. मॉडेलचा फरक हा अधिक व उणे 4 दिवसाचा होवू शकतो म्हणजेच मान्सून 31 मे किंवा 1 जून किंवा ती तारीख 23 मे सुद्धा होवु शकते. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश ते राजस्तान अशा 6 राज्यातील पहाटे 5 चे किमान तपमान. केरळ, तामिळडूमधील अतितीव्र पूर्वमोसमी पाऊस. दक्षिण चीन समोरील विषववृत्त नजीक असलेल्या समुद्री पाण्याचे रात्रीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन, जावा सुमात्रा बेटे, मलेशिया इंडोनेशीया लगतच्या समुद्रावरील पाण्याच्या पृष्ठभागापासून 2 किमी पर्यंत उंची दरम्यानपर्यंत वाहणार्‍या वार्‍याची दिशा व गती तसेच वरील सर्व क्षेत्रातील विषवृत्तदरम्यान वाहणारे वारे, दक्षिण अमेरिकेच्या पेरू चिली समोरील आग्नेय पॅसिफिक महासागरातील पाण्याचे रात्रीतून होणारे उष्णतेचे उत्सर्जन आदी सहा कसोट्यावर आधारित सांख्यिकी मॉडेलनुसार भारतात मान्सून आगमनाचा अंदाज वर्तविण्यात येतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा