कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपले नाही तोच टोमॅटो फ्लू नावाच्या नवीन विषाणूने पालकांची झोप उडवली आहे. खरे तर केरळमधील अनेक भागांमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये एक रहस्यमय आजार आढळून आला आहे. ज्याला टोमॅटो फ्लू असे संबोधले जात आहे. केरळमध्ये आतापर्यंत जवळपास 10 बालकांना टोमॅटो फ्लू ची लागण झाली आहे.

टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
टोमॅटो फ्लू हा एक विषाणुजन्य संसर्ग आहे जो 5 वर्षांखालील मुलांना प्रभावित करतो. या विषाणूजन्य संसर्गाला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे. कारण टोमॅटो फ्लूची लागण झाल्यावर त्यांच्या शरीरावर टोमॅटोसारखे लाल रंगाचे पुरळ येतात आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज सुटते. याशिवाय या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाला खूप तापही येतो. टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांना डिहायड्रेशनच्या समस्येसह शरीर आणि सांधेदुखीमुळे तीव्र वेदना होतात.
टोमॅटो फ्लूची लक्षणे
या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ, त्वचेची जळजळ किंवा खाज सुटणे आणि अंगावर टोमॅटो सारखे पुरळ; परंतु या विषाणूने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये शरीर आणि सांधे दुखणे, पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि अतिसार यासरखी लक्षणेही देखील दिसू शकतात.
टोमॅटो तापापासून बचाव कसा करावा?
हा फ्लूचा दुर्मिळ प्रकार आहे, त्यामुळे त्याची लागण झालेल्या मुलांवरही फ्लूसारखे उपचार केले जात आहेत. वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संक्रमित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून ते हायड्रेटेड राहू शकतील. पुरळांवर खाजवण्यापासून मुलांना रोखा. घर आणि मुलाच्या आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या. संसर्ग झालेल्या मुलापासून अंतर ठेवावे आणि सर्वांत महत्त्वाचे सकस आहार घ्यावा.
कशामुळे होतो टोमॅटो फ्लू?
टोमॅटो फ्लू हा एक दुर्मिळ आजार आहे जो 5 वर्षाखालील मुलांमध्ये दिसून येतो. त्यामुळेच आरोग्य विभागाला याबाबत अद्याप अचूक माहिती देता आलेली नाही. याबद्दल माहिती नसल्यामुळे, हा रोग कोणत्या कारणामुळे पसरत आहे किंवा त्याची कारणे काय आहेत हे सांगणे फार कठीण आहे.
पप

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा