दिल्ली : दिल्लीतील मुंडका परिसरात एका तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. आगीत जखमी झालेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी आगीला सुरुवात झाली. या इमारतीत खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. अग्निशामक दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, मात्र आग नियंत्रणात आणणे कठीण ठरत होते. इमारतीच्या खिडक्या तोडून अनेक कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत जवळपास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. इमारतीच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आधी आग लागली. काही वेळातच ही आग दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर पसरली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा