उद्योगपती एलॉन मस्क मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा बरेच दिवस रंगली. पण ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार तात्पुरता स्थगित केला आहे. ही माहिती मस्क यांनी स्वतः ट्विट करून दिली. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसले. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत.

ट्विटरवर सध्या ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत, या खात्यांची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्याने ट्विटर खरेदीचा व्यवहार तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हणले.

४४ अब्ज डॉलर्सना खरेदी केले ट्विटर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार या वर्षी पूर्ण होईल. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे आता ट्विटरवर मोफत सेवा मिळणार की नाही? हा प्रश्न युजर्संना पडला आहे. याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक आणि सरकारी युजर्संना त्याच्या वापरासाठी पैसे खर्च करावे लागतील. तर सामान्य युजर्सबाबतही त्यांनी आपले मत स्पष्ट केले.

ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड

इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली असल्याची माहिती समोर आली. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती ट्विटरची ४४ अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.

रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तामध्ये मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना सांगितले की कंपनीच्या व्यवस्थापनावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन मध्येही मस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या पदी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अग्रवाल यांना १२ महिन्यांआधीच काढून टाकले तर कंपनीला त्यांना ३८.७ अब्ज डॉलर (सुमारे २९६ कोटी रुपये) द्यावे लागतील. मात्र, कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पराग अग्रवाल या पदावर राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा