किल्ले पुरंदरची शरद पवार यांनी केली पाहणी

सासवड, (वार्ताहर) : देशातील अठरापगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रयतेच्या मदतीने स्वराज्याच्या शत्रूशी जबरदस्त संघर्ष करत स्वराज्य रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले, असे प्रतिपादन माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी केले.

किल्ले पुरंदर येथे लष्कराच्या वतीने सभागृह बांधण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली आहे. तसेच, लष्कराच्या वतीने गडावर अनेक विकास कामे केली आहेत. 14 मे 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजर्‍या होणार्‍या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले पुरंदरची पाहणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे नेते विजय कोलते, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, बबूसाहेब माहूरकर, दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप, दत्ता चव्हाण, निलिमा लोळे, सुनिता कोलते, गौरी कुंजीर प्रदिप पोमण, माणिकराव झेंडे पाटील, प्रशांत पाटणे, कांचन निगडे, गणेश येवले, जयदीप बारभाई, बापूसाहेब भोर, विठ्ठल मोकाशी, अनिल जगताप, महेश जगताप, बंडूकाका जगताप, महेंद्र घोडके, मयूर जगताप, सुनील कुंजीर, पिंटू जगदाळे, कुमुदिनी पांढरे, मंगल म्हेत्रे, नीता सुभागडे, चंद्रकांत बोरकर, प्रदीप बोरकर, बाळासाहेब डांगे, हरिभाऊ लोळे, गौरव कोलते, अजिंक्य टेकवडे, चेतन जाधवराव आदींसह विविध संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष छगन शेरे, प्रदेश संघटक अमोल काटे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, कार्याध्यक्ष संतोष हगवणे, पुरंदर तालुका अध्यक्ष सागरनाना जगताप, सासवड शहराध्यक्ष गौरव जगताप, जेजुरी शहराध्यक्ष संदीपआप्पा जगताप, संघटक आनंद जंगम, दादा खाटपे, फलटण अध्यक्ष शंभू सिंह नाईक-निंबाळकर आदीसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी केले. शरद पवार पुढे म्हणाले काही लोकांनी लेखणीचा गैरवापर करून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रविण गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी इतिहासाचा मागोवा घेत सर्वसामान्य जनतेला शिवशंभो छत्रपतींचा इतिहास सांगण्याचे कार्य केले.या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. भारतीय लष्कराने किल्ले पुरंदरवर अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याबद्दल भारतीय लष्कराचे जनतेच्या वतीने अभिनंदन करतो.प्रास्तविक अजयसिंह सावंत यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले.आभार संतोष हगवणे यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा