तिरुअनंतपुरम : केरळमधील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आरोग्य विभागाने राज्यभर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या 82 रुग्णांची नोंद झाली असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढू शकते. हा ताप संसर्गजन्य आहे. आरोग्य विभागाने सर्वाधिक प्रकरणे आढळलेल्या जिल्ह्यांतील अंगणवाड्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. टोमॅटो ताप 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. क्वचितच तो प्रौढांमध्येही दिसून येतो. या आजाराचे कारण अद्याप कळलेले नाही. बाधित रुग्णांच्या त्वचेवर लाल पुरळ उठतात आणि या त्वचेच्या पुरळांमुळे त्याला टोमॅटो ताप असे नाव पडले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा