नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची गुरूवारी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान आयुक्त सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ 14 मे रोजी संपत आहे. त्यानंतर, 15 मे रोजी राजीव कुमार पदभार स्वीकारतील, असे विधी आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अधिसूचना टाकत कुमार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा