ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यापार्‍याच्या घरी छापा टाकून 6 कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह सात पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे ठाणे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या प्रत्येक पोलिसाची विभागीय चौकशी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. याप्रकरणी इब्राहिम शेख नावाच्या व्यक्तीने गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर याचे बिंग फुटले आहे.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात खेळण्याचे व्यापारी फैजल मेमन राहतात. 12 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. यावेळी पोलिसांना त्यांच्या घरात 30 बॉक्समध्ये 30 कोटींची रोकड आढळली. प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी प्रमाणे पोलिसांनी सर्व बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी खेळणे व्यापारी फैजल मेमन यांना दमदाटी करून त्यांच्याकडून 6 कोटी रुपये उकळले, असा आरोप गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात आणलेल्या 30 बॉक्सपैकी 6 बॉक्स म्हणजेच 6 कोटी रुपये काढून घेतले आणि उर्वरित 24 कोटी रुपये खेळणे व्यापारी फैजल मेमन यांना परत दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा