पुणे : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाच्या नावाखाली गैरव्यवहार सुरू असल्याच्या महिलेच्या आरोपानंतर पुण्यातील नामांकित रूबी हॉल रूग्णालयाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रूबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, विधी सल्लागार वकील मंजूषा कुलकर्णी आणि चार डॉक्टरांसह 15 जणांच्या नावे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यासह तक्रार करणार्‍या महिलेचेदेखील नाव आरोपींमध्ये समाविष्ट केले आहे.

विश्वस्त डॉ. ग्रँट, विधी सल्लागार कुलकर्णी यांच्यासह रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या उपसंचालक रेबेका जॉन, कन्सल्टंट नॅफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, अवयव प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी, अमित साळुंखे, त्याची पत्नी सुजाता साळुंखे, अवयवदाता व तक्रारदार सारिका सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा