बीजिंग : तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला गुरुवारी सकाळी चीनच्या चोंगकिंग विमानतळावर आग लागली. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोंगकिंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक फ्लाइट टेक ऑफ दरम्यान रनवेवरून खाली उतरले, त्यामुळे त्यात आग लागली.

विमानात 113 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाला आग लागल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विमानातून धूरही निघताना दिसत आहे. बचाव पथकाकडून विमानावर पाणी टाकण्यात येत असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आग विझवण्यात आली असून धावपट्टी बंद करण्यात आली आहे.

तिबेट एअरलाइन्सने सांगितले की, विमान चीनमधील चोंगकिंगहून तिबेटमधील न्यांगचीला जात होते. अचानक विमानाने धावपट्टीवरून टेकऑफ केले आणि आग लागली. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा