उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

लखनऊ : उत्तर प्रदेशात मदरशांत राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यात उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विना अनुदानित सर्वच मदरशांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मदरशांतील वर्ग सुरु करण्यापूर्वी सकाळी प्रार्थनेच्यावेळी राष्ट्रगीत होणार आहे. रमजान आणि ईदच्या सुट्टीनंतर गुरुवारी राज्यातील सर्व मदरशे सुरु झाले आहेत. 14 मे पासून मदरशांमध्ये परीक्षा सुरु होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील मंदिर आणि मशिदींवरील भोंगे हटवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी घेतला होता. यात राज्यातील एक लाख भोंगे हटवण्यात आल्याची माहिती त्यांनीच यापूर्वी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा