श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या अधिकार्‍याला लक्ष्य केले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला.

राहुल हे काश्मिरी पंडित असल्याचे सांगण्यात येत असून ते बराच काळ महसूल विभागात कार्यरत होते. मात्र गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या. दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, त्या दहशतवाद्यांना लवकरच पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

या हल्ल्यानंतर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. खोर्‍यातील काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यास मोदी सरकार असमर्थ असल्याचे काँग्रेस नेत्या अश्विनी हांडा म्हणाल्या.

या वाढत्या घटनांमुळे काश्मिरी पंडितांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. श्रीनगर महामार्ग रोखून सातत्याने घोषणाबाजी करण्यात आली आणि न्यायाची मागणी करण्यात आली. त्यांना खोर्‍यात सुरक्षेची हमी द्यावी, असा आग्रह धरण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा