नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव देवेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा याच्या पाठीमागे हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्तवला आहे.

भारतीय हवाई दलाचा जवान देवेंद्रला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून भारतीय हवाई दलाच्या संदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयने मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हवाई दलाच्या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात संबंधित जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आल्याचेही समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला जवान देवेंद्र हा कानपूर येथील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून वायूसेनेच्या संदर्भातील संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र याला धौला कुआं येथून अटक करण्यात आली आहे. देवेंद्र हा कानपूर येथील रहिवासी आहे. एका महिलेसोबत सोशल मीडियावर त्याची मैत्री झाली होती. त्यानंतर तो या महिलेसोबत फोनवर अश्लील चॅट करत असे आणि त्याच दरम्यान तो हनी ट्रॅपमध्ये अडकला. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा