नवी दिल्ली : केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेच्या दरम्यानचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे.

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वर्धक मात्रेमध्ये सरकराने सलवत देण्याचा निर्णय घेतला आहे. NTAGI ने केलेल्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रे मधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आले.

सरकारच्या सल्लागार समितीने शिफारस केली होती की, जे लोक परदेशात प्रवास करणार आहेत, ते ९ महिन्याच्या सक्तीच्या कालावधीच्या आधी ज्या देशात जाणार आहेत तेथील आवश्यकतेनुसार कोरोना लसीची वर्धक मात्रा घेऊ शकता. आतापर्यंत १८ वर्षावरील ज्यांनी ज्यांनी कोरोनाची दुसरी लस घेऊन ९ महिने पूर्ण केले आहेत ते सर्वजण वर्धक मात्रा घेऊ शकतात. हा कालावधी आता ३ महिने म्हणजेच ९० दिवसांचा करण्यात आलाय.

देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. जर राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्या वाढली तर आपण योग्य काळजी घेऊ, असे ही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा