पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते.

संजीवनी करंदीकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संजीवनी करंदीकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा