मुंबई, (प्रतिनिधी) : परभणीतील कंत्राटदार व त्यांच्या पत्नीने गुरूवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना त्वरित ताब्यात घेतले.

राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते डांबर कामगार कंत्राटदार आहेत. सार्वजनिक विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांकडून त्रास होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते उपकंत्राटदार म्हणून कामे घेतात. मूळ कंत्राटदाराने पैसे दिले नाहीत म्हणून बांधकाम विभागाने पैसे द्यावेत अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी परभणी, नांदेड व मुंबईतही उपोषण पुकारले होते. त्यानंतर त्यांची मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठकही झाली होती. पण, पैसे मिळत नसल्याचे सांगत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिस अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा