लंडन : कोरोनाविरोधी लशीचा चौथा डोस हा अधिक प्रभावी आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्‍ती अधिक वाढते, असा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनातून ही माहिती उघड झाली आहे. लान्सेट इन्फेक्शिअस डिसीज जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. फायझर किंवा मोडेमा लशीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जातात. तिसरा डोस दिल्यानंतर चौथा डोस घेतल्यावर रोगप्रतिकारशक्‍ती अधिक वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे. दोन डोस घेतल्यावर तिसरा डोस हा खबरदारीचा उपाय म्हणून घेतला जातो. त्यानंतर आणखी चौथा डोस घेतल्यास तो अधिक प्रभावी ठरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा