पुणे : केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या आदेशानुसार आता पीओपीपासून मूर्ती बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व मूर्ती उत्पादकांनी पीओपीच्या मूर्ती तयार करू नयेत, असे आदेश महापलिका प्रशासनाकडून देण्यात?आले आहेत, अशी माहिती पर्यावरण विभागाचे प्रमुख यशवंत माने यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून पीओपीच्या मूर्तींवर बंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील मूर्ती उत्पादक कारागीर कामगार व इतर सर्व संबंधितांना यापुढे पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली असल्याचे कळवण्यात येत?आहे. शहरात कोणत्याही मूर्ती उत्पादकांनी पीओपीच्या मूर्तीचे उत्पादन करु नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे. मूर्ती उत्पादक, कारागीर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेशमूर्तीबाबत आता जनजागृतीसुध्दा करण्यात येणार?आहे. सर्वांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

रोजगार बुडण्याची शक्यता

शहरात मोठ्या प्रमाणात आजही पीओपी मूर्ती बनवल्या जातात. मातीपासून बनवण्यात?येणार्‍या मूर्तींची संख्या मागणीच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे काही प्रमाणात किंमती वाढण्याची शक्यता?आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा आणि कोकण, नगर, पेन. या भागातून पीओपीच्या मोठ्याप्राणात मूर्ती पुण्यात येतात. तसेच, राज्याच्या अन्य भागातसुध्दा जात?असल्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा