कोलंबो : श्रीलंकेत संचारबंदीनंतरही हिंसाचार सुरूच आहे. त्यामुळे दंगल रोखण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश श्रीलंकन संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. आर्थिक संकटाचा सामना कराव्या लागणार्‍या श्रीलंकेत सध्या मोठे अराजक माजले आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी अध्यक्ष गोताबया यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला आहे. महिंदा राजपक्षे यांनी नौदलाचा आश्रय घेतला आहे. मात्र, ही माहिती मिळताच आंदोलकांनी नौदल तळावर देखील निदर्शने सुरू केली आहेत. पंतप्रधानांचे सरकारी आणि वडिलोपार्जित निवासस्थान आंदोलकांनी पेटवून दिले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून, 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा