बंगळुरू : कर्नाटक सरकारने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिक्षेपक वापरास बंदी केली आहे. यापुढे राज्यात रात्रीच्यावेळी अधिकृत परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक लावता येणार नाही. याबाबत कर्नाटक सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिक्षेपक अथवा माईकचा वापर ऑडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल वगळता अन्यत्र कोठेही करता येणार नाही. या अधिसूचनेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवालादेखील देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा