मुंबई : आयपीएल 2022 चा 58 वा सामना राजस्तान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर खेळला जात आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोन्ही संघ बदलांसह उतरले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रिपल पटेल आणि चेतन साकारिया यांना संधी देण्यात आली आहे. तर ललित यादव आणि खलील अहमद यांना या सामन्यात स्थान मिळालेले नाही. शिमरॉन हेटमायर वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी रासी व्हॅन डर डुसेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.

दिल्लीने 11 पैकी 6 सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असूनही, प्लेऑफसाठी त्यांचा रस्ता तितकासा सोपा नाही. कारण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे समान सामन्यांत दहा गुण आहेत. दिल्लीचा नेट रन रेट अधिक 0.150 असला तरी त्यांना पुढील तीन सामने जिंकावे लागतील.

दुसरीकडे, राजस्तान 14 गुणांसह तिसर्‍या स्थानावर असून पात्र होण्यासाठी त्यांना फक्त दोन गुणांची गरज आहे. त्याचा रनरेट देखील 0.326 अधिक आहे जो शेवटच्या गणनेत उपयुक्त ठरू शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा