पुणे : आयपीएल 2022 च्या 57 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना 62 धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 144 धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ 13.5 षटकांत 82 धावांत गारद झाला. लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. यश दयालने क्विंटन डी कॉकला माघारी पाठवले. पाचव्या षटकात केएल राहुल बाद झाला. सहाव्या षटकात यश दयालने करण शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पॉवरप्लेमध्ये 37 धावा झाल्या आणि 3 विकेट पडल्या. कृणाल पांड्याला आठव्या षटकात राशिद खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. साई किशोरने 11व्या षटकात आयुष बडोनीला बाद केले. मार्क्स स्टॉइनिस 12व्या षटकात बाद झाला. 12व्या षटकात जेसन होल्डरला राशिद खानने बाद केले. साई किशोरने मोहसीन खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रशीदने 14व्या षटकात दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राशिद खानने आवेश खानला 12 धावांवर बाद करत लखनऊचा डाव संपवला.

तर गुजरातकडून शुभमन गिलने अर्धशतक झळकावले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसर्‍या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. मोहसीन खानने वृद्धमान साहाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 5व्या षटकात आवेश खानने मॅथ्यू वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्लेमध्ये 35 धावा झाल्या आणि दोन विकेट पडल्या. आवेश खानने 10व्या षटकात हार्दिक पांड्याला पायचीत केले. डेव्हिड मिलरला 16व्या षटकात जेसन होल्डरने बाद केले. राहुल तेवतिया 22 आणि शुभमन गिलने 63 धावा करून नाबाद राहिले.

शुभमन गिलने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2022 च्या 57व्या सामन्यात गुजरात संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा 62 धावांनी पराभव केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या खात्यात आता 18 गुण आहेत.

गुजरात टायटन्सच्या या सामन्यात शुभमन गिलने शानदार खेळी खेळली आणि 68 धावा करून नाबाद राहिला. शुभमन गिल या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

शुभमन गिलने मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 49 चेंडूत 63 धावा केल्या. या डावात त्याने 7 चौकार मारले आणि संपूर्ण 20 षटके क्रीजवर टिकून राहिला. आयपीएलच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली आणि एकही षटकार मारला नाही. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली आहे.

सचिन तेंडुलकरने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता शुभमन गिलने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.शुभमन गिलच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर या मोसमात आतापर्यंत त्याने 12 सामन्यात 284 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे, तर त्याची सरासरी 35 च्या आसपास आहे.

गिलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 40 चौकार,9 षटकार मारले आहेत.शुभमन गिलने सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले की, क्रिकेटमध्ये कोणता दिग्गज त्याच्यासाठी मोठा प्रेरणास्थान आहे. 22 वर्षीय शुभमन गिल म्हणाला की तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याची प्रेरणा मानत होता पण आता निवृत्तीनंतर तो विराट कोहलीचा चाहता आहे. भारतासाठी 13 सामने खेळलेला शुभमन गिल म्हणाला, मी मोठा होत असताना सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे सचिन सर होते. ते निवृत्त झाल्यापासून आणि मला हा खेळ थोडा अधिक समजू लागल्यापासून मी विराटचा चाहता आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा