मुंबई : शेअर बाजारात आज (बुधवारी) सलग तिसर्‍या दिवशी पडझड झाली. सुरूवातीपासून घसरत असलेल्या बाजारात तो बंद होईपर्यंत घसरण सुरू होती. सेन्सेक्स 75.91 ने घसरला तर निफ्टीे 16,230 वर आहे. या घसरगुंडीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे.

शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात मंगळवारी बंद झाला होता. आज त्यात सुधारणा होईल, अशी आशा गुंतवणूकदारांना होती. मात्र, ती तिसर्‍या दिवशी फोल ठरली. एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व क्षेत्रामध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स 105.82 अंकांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. निफ्टी 61.80 अंकांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा