नोएडा : यमुना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांमध्ये चार जण पुण्याचे रहिवासी आहेत, तर एक कर्नाटकचा आहे. मृतांमध्ये चार महिला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या वाहनाने ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले होते. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आले तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांमधील चार प्रवासी महाराष्ट्रातील असून ६० वर्षाच्या वयोगटातील आहेत. चालकाची झोप लागल्याने हा अपघात झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सध्या ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. नातेवाईक पोहोचल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील. गेल्या आठवड्यात यमुना एक्स्पेसवेवर मथुराजवळ मागून येणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर सात जणांचा मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा