पुणे : शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, वाहनतळांच्या तुलनेत रस्त्यावरील पाकिर्र्ंगसाठी तीस टक्के जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नवाखाली शहरातील रस्त्यांवर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरण राबविण्याचा घाट मार्च 2018 मध्ये महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी व प्रशासनाने घातला होता. याला सत्ताधारी भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली. या धोरणासाठी पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये, यासाठी मुख्य सभेत उपसूचना देवून प्रमुख पाच रस्त्यांवर प्रयोगिक तत्त्वावर सहा महिन्यासाठी ही योजना राबविण्याचा मार्ग अवलंबण्यात आला.

यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास 38 रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयास दिला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक स्मरण पत्रे दिली. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. आता महापालिकेतील सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती आल्यानंतर प्रलंबित पे अ‍ॅन्ड पार्किंगचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

महापालिका सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी पे अ‍ॅन्ड पार्किंग लागू करण्यात येणार आहे. मात्र, रस्त्यावरील पार्किंगसाठी बांधलेल्या व पूर्वीच्या वाहनतळापेक्षा 30 टक्के जास्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

  • पार्किंगची 60 टक्क्यांपेक्षा कमी गरज असलेल्या परिसरात :
  • वाहनतळामधील शुल्क : चारचाकीसाठी 07 रुपये, दुचाकीसाठी 01 रुपये
  • रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 10 रुपये, दुचाकीसाठी 02 रुपये
  • पार्किंगची 60 ते 80 टक्के गरज असलेल्या परिसरात :
  • वाहनतळामधील शुल्क : चारचाकीसाठी 10 रुपये, दुचाकीसाठी 02 रुपये
  • रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 15 रुपये, दुचाकीसाठी 03 रुपये
  • पार्किंगची 80 ते 100 टक्के गरज असलेल्या परिसरात :
  • वाहनतळामधील शुल्क : चारचाकीसाठी 14 रुपये, दुचाकीसाठी 03 रुपये
  • रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 20 रुपये, दुचाकीसाठी 04 रुपये

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा