प्योंगयांग : उत्तर कोरियाने रशियाच्या युक्रेनबाबतच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अध्यक्ष किम जोन उन यांनी रशियाला सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.नाझी जर्मनीचा पाडाव केल्यानिमित्त विजय दिन सोहळ्यात पुतीन यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी युक्रेनवर हल्‍ला चढविल्याचे म्हंटले होते. त्याबाबीचा उल्‍लेख करून जोन उन यांनी पुतीन यांना पाठिंबा दिला आहे. युक्रेनला पाठिंबा देऊन अमेरिकेने रशिया आणि युक्रेन युद्धात तेल ओतल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा