मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना कोरोनाची लागण आहे. कोरोना पॉझिटिव्ह असले तरी सौम्य लक्षणे आहेत.ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. पूर्ण बारा होई पर्यंत विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले. बिल गेट्स म्हणाले की, “मी भाग्यवान आहे की, माझे लसीकरण झाले आणि मी वर्धक मात्रा देखील घेतली आहे आणि मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.”
‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ ही जगातील सर्वात प्रभावशाली खासगी संस्थांपैकी एक आहे, ज्याची एकूण संपत्ती अंदाजे ६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. विशेषतः गरीब देशांमध्ये ते लोकांसाठी लस आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.