नवी दिल्ली : अमेरिकेच्या तुलनेत दिवसेंदिवस रुपया कमकुवत होत चालला आहे. सोमवारच्या सुरूवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 52 पैशांनी घसरला. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 77.42 रुपये मोजावे लागत आहेत. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी कमकुवत झाला होता. त्यावेळी एका डॉलरसाठी 76.90 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची स्थिती दर्शवणारा निर्देशांक 0.35 टक्क्यांनी वाढून 104.02 वर पोहोचला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा