मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 70 व्या वर्षी बाप बनणार आहेत. त्यांची मैत्रीण अलिना कबाइव्हा (वय 38) या पुन्हा गर्भवती राहिल्याने पुतीन बाप बनणार असल्याची चर्चा माध्यमात सुरू झाली आहे.

पुतीन यांना अगोदरच अलिना यांच्यापासून दोन मुले झाली आहेत. अलिना या माजी ऑलिप्मिक जिमनेस्टपटू आहेत. दोन मुले झाली आता पुरे, असे पुतीन नेहमी सांगत होते. पण, अलिना गर्भवती असल्याचे कळताच त्यांना देखील आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ते 70 व्या वर्षांत पदार्पण करत असताना ही बातमी समोर आली आहे. रशियन वृत्तवाहिनी जनरल एसव्हीआर टेलिग्रामने अलिना या गर्भवती असल्याचे वृत्त दिले आहे. मॉस्कोतील लाल चौकात जर्मनीवरील विजयाचा उत्सव साजरा होत असताना त्यांना अलिना या गर्भवती असल्याची आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा