नवी दिल्‍ली : खनिज तेलाचे दर सोमवारी कोसळले आहेत. तेलाची मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. फ्यूचर खनिज तेलाचे दर 0.44 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे या तेलाचा प्रति पिंप दर 8 हजार 410 रुपये झाला.

मे महिन्याच्या पुरवठ्यासाठी दिलेल्या या तेलाचे दर 37 रुपयांनी घसरले. 8 हजार 236 पिंपांसाठीचा दर प्रति पिंप हा 8 हजार 410 रुपये झाला. वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट खनिज तेलाचा दर सुद्धा 1,35 टक्के घसरला असून त्याचा प्रति पिंप दर हा 108 डॉलर झाला. न्यूयॉर्क येथील ब्रेट तेलाचा दर 1.25 टक्के घसरून 110. 99 प्रति पिंप झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा