पुणे : नैऋत्य हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने असनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे वादळ मंगळवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत येणार आहे. मात्र किनारपट्टीला न धडकताच तेथून वळसा घेवून ते उत्तर, पूर्व (पं. बंगाल आणि बांगलादेश) दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला कोणताही धोका नाही. हे वादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचा वेगही कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सोमवारी स्पष्ट केले.
अस्नी चक्री वादळ आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता. मात्र हे चक्रीवादळ तेलंगणाच्या किनारपट्टीकडे न जाता आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे जाईल. तेथून वळसा घेवून पं. बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकेल. याच वादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, पं. बंगाल या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस वादळ जमिनीवर धडकेपर्यंत कायम असणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र म मान्सूनची प्रतीक्षा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिमेच्या वार्‍याची दिशा अंदमान कडून केरळकडे जाईल आणि त्यानंतर मान्सून भारतात दाखल होईल. दरम्यान, या महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्व मान्सून दाखल होईल त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात लवकरच वादळीवार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी असलेली उष्णतेची लाट ओसरणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे राजस्तान आणि विदर्भातील अनेक ठिकाणचा पारा 45 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. मे महिन्यात काही ठिकाणी कमाल तपमान 50 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी वर्तविला आहे. सध्याचा उन्हाचा ट्रेंड पाहून हे अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असणार आहे. त्यामुळे यंदा मान्सूनवेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा