पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हा टँकर पुण्याहून मुंबईकडे जात होता.महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली.

खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर उलटला. यावेळी टँकरला ती गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे.

या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुण्या जवळील रुग्णालयात पाठवले. तर, महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात दुपारी १२च्या सुमारास घडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा