मुंबई : आयपीएलच्या 55 व्या सामन्यात काल चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सला भिडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला नॉर्त्जेने पहिला धक्का दिला. त्याने 33 चेंडूत 41 धावा करणार्‍या ऋतुराज गायकवाडला बाद करत शतकी सलामी देणारी जोडी फोडली.

डेवॉन कॉनवे याने आपला चांगला फॉर्म दिल्ली विरूद्धच्या सामन्यातही कायम ठेवला. त्याने दमदार अर्धशतक ठोकत ऋतुराज गायकवाड बरोबर शतकी सलामी दिली.कॉनवे याने 87 धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड 41 धावांवर बाद झाला. शिवम दुबे 32 धावांत माघारी परतला.

दोन्ही संघांची गुणतालिकेतील स्थिती पाहिली तर चेन्नई सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे तर दिल्ली 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामना जर चेन्नईने जिंकला तर दिल्लीचे प्ले ऑपचे गणित अवघड होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा