५.३ रिश्टर स्केलचे धक्के

श्रीनगर : जम्मू: जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के ५.३ रिश्टर स्केलचे असल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तान असल्याचे सांगितले जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये सकाळी ५.३५ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. येथील काही भागांमध्ये हे धक्के जाणवले. आतापर्यंत कुठेही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू काश्मीरपासून १७० कि.मी. अंतरावर ताजिकिस्तानमध्ये असल्याची माहिती आहे.

जम्मू काश्मीरमधील लोक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने काही लोक घराबाहेर पडले होते. तर, बहुतांश लोक झोपलेले होते. अनेंकाना भूकंपाचे धक्के देखील जाणवले नाहीत. भारतासह, अफगाणिस्ताना आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र यांच्याकडून देखील या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात आज पहाटे जाणवलेल्या भूकंपामुळं कुठंही जीवितहानी झालेली नाही.

लडाखमधील कारगीलमध्ये २४ एप्रिलला भूकंपाचे धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. इंडोनेशियामध्ये १९ एप्रिलला ६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार त्याचे केंद्र सुलोवासीपासून ७७९ किमी अंतरावर होतं. त्यापूर्वी तैवानची राजधानी ताइपे येथे देखील ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

८ ऑक्टोबर २००५ मध्ये काश्मीर खोऱ्यात मोठा भूकंप झाला होता. त्यामध्ये ८० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. भारताचा भूभाग असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याचे केंद्र होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा