पुणे : मागील काही दिवसांपासून साबुदाणाच्या दरात मोटी घट झाली होती. दीर्घकाळ दरात वाढ न झाल्याने साबुदाणा उत्पादक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कंपन्यांनी साबुदाणाच्या दरात 200 ते 300 रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साबुदाणाच्या दरात आता घट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
साबुदाणाच्या 90 किलोच्या दरात 300 ते 400 रूपयांनी घट झाली होती. ती घट भरून काढण्यासाठी 90 किलोच्या दरात 300 रूपयाने वाढ करण्याचा निर्णय दुकताच घेण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये साबुदाणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. तेथील उत्पादकांनी दरवाढीचा निर्णय निर्णय घेतल्याने घाऊक बाजारात 90 किलोच्या दरात 300 रूपये, तर किरकोळ बाजारात किलोमागे 3 रूपयांची वाढ होणार आहे. तामिळनाडू येथील उत्पादक महाराष्ट्राला साबुदाणाचा पुरवठा करत असतात. त्यामुळे व्यापार्‍यांना तामिळनाडूच्या उत्पादकांकडूनच साबुदाणा खरेदी करावा लागतो.
याबाबत व्यापारी अशोक लोढा म्हणाले, उपवासाला साबुदाणा चालतो. तसेच हॉटेल चालकांकडूनही साबुदाणाला मागणी असते. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन महिन्यांत साबुदाणाला चांगली मागणी असते. साबुदाणा उत्पादकांनीच दरवाढीचा निर्णय घेतल्याने त्यात आता घट होणार नसल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा