पुणे : संपूर्ण राज्यात कमाल तपमानाने 42 ते 45 अंशाचा आकडा गाठल्यानंतर पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे. बुधवार (4 मे) पासून कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पुढील चार दिवस मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज मंगळवारी हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात कमाल तपमानाचा पारा वाढल्याने प्रचंड ऊन वाढले होते. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट होती. काल चंद्रपूर येथे उच्चांकी 45.2 अंश कमाल तपमानाची नोंद झाली. मागील 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते.
ढगाळ वातावरणामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणच्या कमाल तपमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील कमाल तपमान 40 अंशापेक्षा अधिक आहे. आज पावसाला सुरूवात झाल्यास कमाल आणि किमान तपमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज आहे. हवेत गारवा कायम राहिल्यास वाढलेल्या उकाड्यात घट होणार आहे. हवेत गारवाही टिकून राहिल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा