नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली. ईडीने फेमा (विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999) अंतर्गत शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची तब्बल 5,551 कोटींची संपत्ती जप्त केली. शाओमी इंडिया ही चीन स्थित शाओमी समूहाची उपकंपनी आहे.

शाओमीने फेब्रुवारी महिन्यात बेकायदेशीरपणे परदेशात पैसे पाठविले होते. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू होते. तसेच, शाओमीचे मनू कुमार जैन यांनादेखील समन्स बजावले होते. शाओमीने 2014 पासून भारतात काम सुरू केले. मध्यंतरी, ‘रॉयल्टी’ म्हणून तीन परदेशातील संस्थांना पैसे पाठवण्यात आले. यात शाओमी समूहाच्या एका घटक कंपनीचा समावेश होता. शाओमीची भारतातील स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी जवळपास 24 टक्के आहे. वर्ष 2021 मध्ये शाओमी भारतात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा