कंपनीने दिले खोचक उत्तर

मुंबई : काही दिवसांपूर्वी टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर मधील १०० टक्के शेअर्स विकत घेतले. मस्क यांनी त्यानंतर कोकाकोला विकत घेणार असल्याचे गमतीने म्हटले होते. आता भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने मस्क यांना स्वीगी ही फुड डिलिव्हरी करणारी कंपनी विकत घेण्यास सुचवले. गिलने या संदर्भातील पोस्ट थेट सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ती चर्चेत आली आहे.

भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याने शुक्रवारी रात्री एक ट्वीट केले होते. ज्यात एलन मस्क कृपया स्वीगी तुम्ही विकत घ्या जेणेकरून ते वेळेत खाद्यपदार्थ पोहोचवतील. २९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता गिलने केलेले हे ट्विट चर्चेत येण्यास वेळ लागला नाही.

शुभमनच्या या ट्वीटवर काही लोकांनी सहमती दर्शवली तर काहींनी त्याला ट्रोल देखील केले. आता गिलच्या ट्वीटवर एवढी चर्चा झाल्यानंतर स्वीगीकडून उत्तर मिळाले नसते तरच नवल. स्वीगीने गिलच्या ट्विटनंतर ११.२४ मिनिटांनी पहिले उत्तर दिले. हे उत्तर स्वीगी केअर्सवरुन दिले गेले.तर त्यानंतर ११.२७ मिनिटांनी स्वीगीच्या मुख्य ट्विटवरून एक खोचक ट्विट केले. ज्यात, तुझ्या टी-२०मधील फलंदाजीपेक्षा आमची फुड डिलिव्हरी वेगात आहे, असे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा